मराठी भाषा प्रबळ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत-कवियत्री सौ. सुनंदा कांबळे

भंडारी एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल मध्ये आज मराठी राजभाषा दिन साजरा

मालवण, दि.२७ फेब्रुवारी
आपण मराठी भाषिक आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषा हि आपली माय आहे. आणि परदेशातून आपल्याकडे आलेली इंग्रजी भाषा हि आपली मावशी बनली आहे. मात्र आज आपण इंग्रजीच्या आहारी गेल्यामुळे वेड्यासारखे इंग्रजी वर प्रेम करू लागलो आहोत. मात्र हा वेडेपणा आपण सोडून मराठी भाषा प्रबळ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन
विजयदुर्ग येथील ख्यातनाम कवियत्री आणि “कोकणच्या बहिणाबाई” सौ. सुनंदा कांबळे यांनी येथे बोलताना केले

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल मध्ये आज मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला त्यावेळी कांबळे या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी श्री. दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नऱ्होना, मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर, श्री. आर. डी. बनसोडे, प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले. तर मुख्याध्यापक श्री. तिवले सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय सुनंदा वराडकर यांनी करून दिला.

यावेळी बोलताना सौ सुनंदा कांबळे म्हणाल्या आज जगात काही करून दाखवायचे असेल तर इंग्रजी शिवाय पर्याय नाही, असे जे म्हटले जाते ते साफ खोटे आहे. मराठीमध्ये शिकूनही आपण उच्चपदावर जाऊ शकतो, आणि त्याची अनेक उदाहरणेही आपल्या समाजात आहेत म्हणूनच मराठी भाषेला टिकविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे मुलांनी वाचले पाहिजे वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते वाचल्यामुळे माणूस प्रगल्भ बनतो म्हणून वाचते व्हा, लिहिते व्हा असे आवाहन त्यांनी केले यावेळी कवियत्री सौ कांबळे यांनी स्वरचित मराठी व मालवणी कविता सादर केल्या

यावेळी मराठी राजभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेचा गौरव करणारी भाषण केली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. सुनंदा कांबळे यांचा संस्थेचे लोकल कमिटी सेक्रेटरी श्री. कवटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी आर डी बनसोडे यांनी आभार मानले