जिल्हा नियोजन मधून कुळकरवाडी- बावखोलवाडी रस्ता खडीकारण डांबरीकरण : ग्रामस्थानी व्यक्त केले समाधान
मालवण, दि.२७ फेब्रुवारी
चौके गावातील चौके- कुळकरवाडी तसेच चौके- बावखोलवाडी या रस्त्यांची भूमिपूजने भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंगळवारी करण्यात आली.
यावेळी चौके माजी सरपंच राजन गावडे, सुरेश चौकेकर,सदाशिव गावडे, दिगंबर गावडे, सूर्यकांत गावडे, मनीषा वराडकर,अक्षता गायकवाड, सचिन आंबेरकर,सुरेश गावडे, राघो गावडे,उदय गावडे,शिवदास मांजरेकर मंगेश पात्रे, प्रभाकर गावडे,यांच्यासह चौके ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौके- कुळकरवाडी तसेच चौके बावखोलवाडी या रस्त्याना गतवर्षी जिल्हा नियोजनच्या पंचवीस पंधरा योजनेमधून मंजुरी मिळाली होती. या दोन्ही रस्त्याना खाडीकरण डांबरीकरण यासाठी तुम्हारे पाच- पाच लाख रुपये मंजूर झाले आहेत.या दोन्ही रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरण होण्यासाठी खा.निलेश राणे यानी विशेष प्रयत्न करून मंजूर केले होते