पोस्टमधून दोघांवरही जोरदार टीका ; सामंत यांचे विश्वासघातकी राजकारण पाहता, यातून भाजपने धडा घ्यायला हवा..
रत्नागिरी दि.१३ जानेवारी
हम तुम एक कमरे मे बंद हो…और सेटलमेंट हो जाये!
रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साध्याभोळ्या भाजपेयी मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनो, जय श्रीराम!
आज या पोस्टसोबत एक फोटो जोडला आहे. अर्थात हा फोटो दि. १३ जानेवारी २०२४ च्या सकाळचा आहे. या फोटोत दिसणारे उबाठा गटाचे सध्याचे खासदार अर्थात मागीलवेळी युतीत निवडून आलेले विनायक राऊत आणि दुसरे सध्याचे शिंदे गटाचे मंत्री अर्थात मागीलवेळी युतीच्या जीवावर निवडून आलेले उदय सामंत दिसत आहेत. आता या आधीही यांच्यात गुप्त बैठका झाल्या आहेत. त्यामुळे मी याबद्दल काही गौप्यस्फोट करणार आहे. त्यावर तुम्ही तुमच्या भविष्यात होणाऱ्या चुका सुधारा किंवा पटलं नाही तर विसरून जा! पण लेख पूर्ण वाचा तरच हम तुम कमरेमे बंद हो और सेटलमेंट हो जाये.. या मथळ्याचा अर्थ कळेल. तर आता मुद्द्याला हात घालूया!
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात १०० दिवसांनी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत आणि सामंत यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्याचा फोटो बाहेर आला. आता सगळेच म्हणतील की ही भेट अनावधानाने होती. पण जे सामंत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात, युवराज आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कधीही टीका करतात. त्यांना ठाकरे यांचे विश्वासू राऊत भेटू शकतात, हे म्हणजे ठाकरे यांचे खाऊ आणि सामंत यांचे गुण गाऊ असं नव्हे का? पण यामागे धूर्त आणि कपटी राजकारण आहे. रत्नागिरी – लोकसभा निवडणुकीत राऊत यांना सामंत यांनी मदत करायची आणि बदल्यात रत्नागिरी आणि राजापूर या दोन विधानसभा मतदारसंघात राऊत यांच्या शिवसैनिकांनी सामंत बंधूना पायघड्या घालायच्या..म्हणजे लोकसभेला भाजपचा उमेदवार पाडायचा आणि दोन्ही विधानसभा मतदारसंघात सामंत यांचे घराणे निवडून आणायचे. म्हणजे राऊत हे राजापूरातून आमदार राजन साळवी यांचा राजकीय गेम करण्याची रचना करत आहेत. त्यामुळे राजन साळवी यांनीही सावध व्हावे. किरण सामंत यांना खासदारकी लढावायची नाहीच मुळी.त्यांना आपल्या मुलीला राजापूरातून निवडून आणायचे आहे आणि रत्नागिरीतून उदय सामंत यांना निवडून आणून रत्नागिरी जिल्ह्यात सामंत पॅटर्न तयार करायचा आहे. अर्थात सिंधुदुर्ग राणे यांचा तसा रत्नागिरी सामंत यांचा, असे वातावरण तयार करण्यात येत आहे.
आत्तापर्यंत सामंत यांचे विश्वासघातकी राजकारण पाहता, यातून भाजपने धडा घ्यायला हवा! एका लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या तत्कालीन काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादी म्हणून सामंत युतीत असताना राणे यांचा पराभव झाला. त्यात रत्नागिरीत राणे यांना लीड मिळाले नाही. का? त्यावेळी पण अशीच राऊत आणि सामंत यांची गुप्त बैठक झाली होती. त्याचेच फलीत राऊत निवडून आले आणि सामंत शिवसेनावासी झाले. आताही तीच रणनीती सामंत राबवित आहेत. सामंत बंधू भाजपच्या मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, वरिष्ठ नेते यांना सपशेल गंडवीत आहेत.कसे? सामंत युतीच्या बैठका घेऊन आपली मते वाढवीत आहेत. दुसरीकडे राऊत आणि उबाठा गटाच्या मॅनेज पदाधिकाऱ्यांना गोंजारत आहेत. त्यामुळे सामंत यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत बंड्या साळवी, विलास चाळके अजिबात करत नाहीत. बाकी उबाठा गटाचे निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यांना बोलण्यासाठी पाठबळ विनायक राऊत देत नसल्याची चर्चा आहे. अर्थात उदय बने हे सामंत यांच्या विरोधात उभे राहून सामंत यांना डोईजड होतील म्हणून राऊत यांनी मातोश्रीवरून त्यांचे पंख छाटण्याचे पाप करायला सुरुवात केली आहे. विनायक राऊत यांचा हा प्लॅन म्हणजे स्वत:ची खासदारकी वाचविण्यासाठी राजन साळवी आणि उदय बने यांच्या राजकीय जीवनाचा बळी देण्याचे कारस्थान आहे.
दुसरीकडे सामंत यांना दोन विधानसभा जिंकायच्या आहेत. तिथे उबाठा गटाशिवाय त्यांना ते शक्य नाही. भाजपचे निष्ठावंत मतदार सामंत यांना मदत करणार नाहीत, हे जाणून सामंत हे विरोधक सम्पवून टाकायला सुरुवात करित आहेत. सामदामदंडभेद वापरून सध्या गलिच्छ राजकारणाचा वापर ते करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीतून सुदेश मयेकर या मागीलवेळीच्या विरोधी उमेदवाराला गळाला लावण्यात सामंत यशस्वी ठरले. समोर उमेदवार ठेवायचा नाही आणि असेल त्याला बदनाम करायचा हे सगळेच प्रयोग सामंत करतात, याचा अनुभव सगळ्यांनाच असेल. तर त्यामुळे विनायक राऊत यांच्याशी बंद खोलीत गुप्तगु करुन सामंत यांनी आपली आमदारकी वाचवायचा प्रयत्न केला आहे.
हे सर्व पाहता भाजपेयी सर्वानी सावध व्हावे, अन्यथा खासदारकीचा उमेदवार पडेल आणि आमदारकीला पण हाती धुपाटणे येईल. त्यामुळे सामंत यांना दूर ठेवून खासदारकी भाजपने लढतांना विधानसभा निवडणुकीतही भाजपने कमळ चिन्हवर उमेदवार द्यावेत! राजन साळवी यांनी थेट भाजप उमेदवाराला मदत करुन विनायक राऊत यांचा मनसुभा उधळून लावला किंवा राऊत यांना मातोश्रीवरून धडा शिकवावा! अन्यथा काळ सोकावतोय!
तूर्तास जय श्रीराम!
अशी पोस्ट शोशल मीडियावर व्हायरल होत आहे.