ओसरगाव येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला

कणकवली दि.२७ फेब्रुवारी
सहा दिवसापासून बेपत्ता असलेले शशिकांत लक्ष्मण सावंत (८०, रा. ओसरगाव -कानसळीवाडी) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी ११.२७ वा.च्या सुमारास त्यांच्या घरापासून ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या शेत जमिनीत मिळून आला. याबाबतची खबर मयत यांचा मुलगा निलेश शशिकांत सावंत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत