मुंबई,दि.१ ऑक्टोबर
आमच्यासाठी आईवडीलांनी अपार कष्ट घेतले.असून त्यांचे संस्कार आमच्या भावंडावर आजही आहेत.म्हणून मी इथवर पोचू शकले.त्यामुळे शालेय जीवनापासून माझा ओढा शिक्षिका होण्यामागे होता. असे भांडुपगाव शिवाई विद्यामंदिर शाळेतील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. नेहा लघुत्तम भाबल तथा (पूर्वाश्रमीच्या विजया तांडेल )यांनी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल आयोजित सदिच्छा समारंभात उपस्थितांचे ऋण व्यक्त करताना सूचित केले. प्रारंभी प्रास्ताविक करताना सहशिक्षिका सौ. अश्विनी कानोलकर यांनी आपल्या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ .नेहा भाबल ३९ वर्षे आठ महिने या प्रदिर्घ सेवेतून निवृत्त होत असून त्यांनी आजवर अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहेच तसेच शाळेच्या प्रति आत्मीयता जपली आहे. त्यांची आठवण होतं राहिले असे नमूद केले.तसेच सौ. वर्षा केणी यांनीही आठवणींनी जाग्या केल्या. सत्कारदाखल बोलताना सौ. नेहा भाबल म्हणाला की,शाळेचे संस्थापक कै. सदाशिव भोईर यांनी लिपिक म्हणून रूजू करून घेतले. एक वर्ष काम पाहिले.पण शिक्षिका म्हणून जागा उपलब्ध झाल्यानंतर खऱ्याअर्थाने शिक्षिका म्हणून प्रवास सुरू झाला. मात्र एक लक्षात ठेवले. ‘आयुष्यात रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार! यामुळे यशस्वी होता आले . अर्थात यामध्ये मला ज्यांनी ,ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांबद्दल याक्षणी कृतज्ञता व्यक्त करते. यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक विश्वास धुमाळ, सध्या पांडे, वंदना दिक्षित, यासोबतच शाळेच्या उपसचिव डॉ रंजना तामोरे, पत्रकार दत्तप्रसाद शिरोडकर, संदिप तांडेल, सुधा पराडकर, लघुत्तम भाबल, शशिकांत तामोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रत्न भालेराव, माजी मुख्याध्यापक जनार्दन गोळे, संगिता वालावलकर, अश्विनी आयरे, कोषाध्यक्ष मयुरेश भोईर, जेष्ठ शिक्षिका तनुजा भाये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौ. मृणाल मयुरेश भोईर यांनी सौभाग्याचे लेणे प्रदान करून सौ. नेहा भाबल यांना सन्मानित करण्यात आले. याचवेळी इतर संस्थांच्या वतीने त्यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी गौरी भोईर यांनी नेहा भाबल यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या जागी तनुजा भाये या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका होतील. दुहेरी व्यक्तीमत्वांना शुभेच्छा देते असे सांगितले. या रंगतदार समारंभाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सुरेखा उजगरे यांनी केले.


