सावंतवाडी दि.२८ फेब्रुवारी
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दीड कोटीची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजने करिता संबंधित भागाचे आमदार ,मंत्री यांच्याकडून प्राप्त प्रस्तावानुसार राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजने करिता निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ कामांसाठी दीड कोटी रक्कम मान. केसरकर यांच्या शिफारशीनुसार मंजूर करण्यात आलेली आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.
यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. नामदार एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री मान. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मान.अजित पवार व अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री मान. अब्दुल सत्तार यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कामांच्या मंजुरीसाठी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार श्री दीपक केसरकर यांनी शिफारस केली होती व कामे मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होत. या अंतर्गत खालील कामांना मंजुरी मिळालेली आहे, असे राजन पोकळे यांनी सांगितले.
रोणापाल ,ता. सावंतवाडी चर्च समोरील शासकीय जागेत सौर हाय मास्ट बसविणे.रक्कम रुपये ३.५ लक्ष.माजगाव देऊळवाडी तालुका सावंतवाडी रस्त्यालगत मुस्लिम दफन भूमी कंपाउंड वॉल बांधणे. रक्कम रुपये १०.५ लक्ष.आरोस तालुका सावंतवाडी चर्च समोर सौर हाय मास्ट बसविणे .रक्कम रुपये ३.५ लक्ष . कारिवडे ख्रिश्चन वाडी तालुका सावंतवाडी चर्च जवळ सौर हाय मास्ट बसवणे .रक्कम रुपये ३.५ लक्ष.देवसु तालुका सावंतवाडी चर्च समोर सौर हाय मास्ट बसविणे रक्कम रुपये ३.५ लक्ष .
कलंबिस्त मळा तालुका सावंतवाडी येथे चर्च समोर सभा मंडप बांधणे. रक्कम रुपये ९.५ लक्ष.तळवडे तालुका सावंतवाडी येथे तळवडे ख्रिश्चनवाडी येथे सौर हाय मास्टा बसविणे .रक्कम रुपये ३.५ लक्ष.निरवडे तालुका सावंतवाडी निरवडे चर्च समोरील जागेत कंपाउंड वॉल बांधणे .रक्कम रुपये ५ लक्ष .उभादांडा ता. वेंगुर्ले चर्च परिसरासमोरील आवार सुशोभीकरण करणे. रक्कम रुपये २५ लक्ष. झाराप मुस्लिम वाडी तालुका कुडाळ उठील N H 66 ला लागून झाराप मुस्लिम वाडी ते कांबळेवीर जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे .रक्कम रुपये २० लक्ष. झाराप मुस्लिम वाडी तालुका कुडाळ NH 66 लागून झाराप मुस्लिम वाडी ते कांबळेवीर जाणाऱ्या रस्त्यास स्ट्रीट लाईट बसविणे रक्कम रुपये ८ लक्ष.झोळंबे ता. दोडामार्ग मुख्य रस्ता आयबुरबेल ख्रिश्चनवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.रक्कम रुपये ५ लक्ष. साटेली ख्रिश्चनवाडी सातेरी मंदिर रस्ता ग्रा. क्र . मा.59 रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे .रक्कम रुपये ५ लक्ष .कोलझर मुंगी दुकान ते ख्रिश्चनवाडी क्रमांक ४६ खडीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम रुपये ८ लक्ष. मनेरी दफनभूमी कंपाउंड वॉल बांधणे .रक्कम रुपये ५ लक्ष. आवाडे ख्रिश्चनवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे . रक्कम रुपये ८ लक्ष.
साटेली करुणा सदन ते शशी परमेकर घर खणगाळे कडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रक्कम रुपये ८ लक्ष .उसप मुस्लिम दफन भूमी कंपाउंड वॉल बांधणे. रक्कम रुपये ५ लक्ष. पाळये तिठा ख्रिश्चनवाडी येथे सौर हाय मास्ट बसविणे. रक्कम रुपये ३.५ लक्ष .झरे चर्च जवळ सौर हायमास्ट बसविणे.रक्कम रुपये ३.५ लक्ष. झोळंबे ख्रिश्चन वाडी येथे सौर हायमास्ट बसविणे. रक्कम रुपये ३.५ लक्ष.अशाप्रकारे एकूण दीड कोटीची २१ कामे मंजूर झाली असून यासाठी संबंधित ग्रामपंचायत व संबंधित अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांचे अभिनंदन होत आहे व आभार मानण्यात येत आहेत, असे माजी उपनगराध्यक्ष श्री .राजन पोकळे यांनी सांगितले.