सावंतवाडी,दि.२८ फेब्रुवारी
सावंतवाडी तालुक्यातील शिधापत्रिकेवरील धान्य लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याने मळेवाड येथील माजी पंचायत समिती सदस्य सिताराम उर्फ बाळा शिरसाट यांनी सकाळ पासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असता तहसीलदार श्रीधर पाटील यांनी लेखी आश्वासन दिले त्यामुळे उपोषण स्थगित केले.
सावंतवाडी तालुक्यातील शिधापत्रिकेवर असलेले धान्यापासून वंचित लाभार्थी वर्षे लोटली तरी शासनाकडून त्या लाभार्थ्यांना शिधापत्रिकेवर नाव असून सुध्दा धान्य मिळत नसल्याने त्याच्या निषेधार्थ तहसिल कार्यालयासमोर बाळा शिरसाट यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला होता.त्यानी सकाळी उपोषणाला सुरुवात केली.
सावंतवाडी तालुक्यातील अन्नसुरक्षा अन्नयोजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ई रजिस्टर प्रमाणे धान्यासाठी मंजुर यांदीमध्ये समाविष्ट करणेची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे उपोषण मागे घ्यावे असे लेखी पत्र तहसीलदार श्रीधर पाटील यांनी त्यांना दिल्यावर श्री शिरसाट यांनी उपोषण स्थगित केले. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सरबत भरविल्या वर उपोषण सोडले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर, संजय लाड, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर तसेच मान्यवरांनी उपोषणाला पाठिंबा देत विचारपूस केली.