सावंतवाडी दि.२८ फेब्रुवारी
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेकरिता बैठक व्यवस्था मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव तालुका सावंतवाडी या केंद्रावर करण्यात आली आहे.
परीक्षेतील गैर मार्ग रोखण्याकरिता परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांची चाचपणी केली जाणार आहे त्यामुळे सर्व परीक्षार्थीनी परीक्षेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. सकाळच्या सत्रात साडेदहा नंतर व दुपारच्या सत्रात अडीच नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही तसेच सर्व परीक्षार्थींना दहा मिनिटे अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आलेला आहे.
मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव केंद्र क्रमांक ८४०३ या केंद्रावर मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव, श्री जनता विद्यालय तळवडे, नेमळे पंचक्रोशी विद्यालय नेमळे, माऊली विद्यालय सोनुर्ली ,संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या शाळांमधील विद्यार्थी इयत्ता दहावी मार्च २०२४ ची परीक्षा देणार आहेत
या केंद्रावर बैठक व्यवस्था B 021754 ते B022021, B 032008 अशी आहे. या केंद्रावर २६९ विद्यार्थ्यांची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन मळगाव इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक, केंद्र संचालक यांनी केली आहे.