सावंतवाडी,दि.२८ फेब्रुवारी
नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आठवीत शिकणाऱ्या आठ विद्यार्थ्यांनी एन एम् एम् एस परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. या परीक्षेसाठी एकूण तेरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यापरीक्षेत हर्ष तुकाराम वारंग, भार्गवी धनश्याम आळवे, मिताली गणपत खोत, लावण्या दीपक गुडेकर, प्रांजली स्वप्नील तेली, श्रावणो प्रशांत मुंडये, आदित्य गंगाराम परब, हर्षद मोहन मयेकर हे उत्तीर्ण आले आहेत. नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ, प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर यांनी यशप्राप्त विद्याथ्यर्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक किरण बेटे यांचे अभिनंदन केले.