गोगटे गुरुजी प्रतिष्ठान तर्फे गुणगौरव

सावंतवाडी दि.२८ फेब्रुवारी

येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानची पहिली पालक सभा आजगाव मराठी शाळेत नुकतीच संपन्न झाली. या सभेस २२ पालक तर १६ मुले उपस्थित होती. सुरुवातीला प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक केले. त्यानी संस्थेच्या या वर्षातील कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की,”प्रतिष्ठानतर्फे या वर्षी एकूण १७६ तास पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग, ३६ तास विज्ञान वर्ग, ३२तास इंग्रजी व्याकरण वर्ग आणि ८ तास एस्टीएस् मार्गदर्शन वर्ग असे एकूण २५२ तास मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एकूण १० छोट्या टेस्ट व १० मोठ्या सराव परीक्षा घेतल्या. या शिवाय ६८ दिवस मुलांना अल्पोपाहार दिला गेला.”
त्यानंतर शिष्यवृत्ती सराव परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शाम बेहेरे आणि बबन आडारकर यांचे हस्ते रुपये दोन हजारची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. वेदांत देशमुख, अथर्व हळदणकर आणि प्रचिती शेटये यांनी पहिल्या तीन क्रमांकाची पारितोषिके मिळवली; तर गणेश खोबरेकर, राही पांढरे, तन्वी परब, स्वरा मोरजकर, ऐश्वर्या गावडे आणि गौरांग शिरोडकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. तसेच गणित प्राविण्य परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यात प्रथम व द्वितीय आलेल्या वेदांत व प्रचिती यांचा रोख रकमेची बक्षीसे देऊन सन्मान करणेत आला. ही पारितोषिके दीपक प्रभू आणि विनय सौदागर यांनी पुरस्कृत केली होती. मार्गदर्शन वर्गातील सर्व विद्यार्थ्याना गणेशप्रसाद गोगटे पुरस्कृत प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
यानंतर झालेल्या पालक सभेत मनोज खोबरेकर, प्रियांका देशमुख, भावना पांढरे, अनिता पांचाळ,गंधाली मोरजकर यांनी विचार मांडले. त्यांनी पूर्णतः विनामूल्य शैक्षणिक व सेवाभावी कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच संस्थेला गणित आणि इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याची त्यांनी विनंती केली, ती प्रतिष्ठानच्यावतीने मान्य करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप पांढरे आणि एकनाथ शेटकर यांनी विशेष परीश्रम घेतले, तर दिपक हळदणकर आणि मनोज खोबरेकर यांचे सहाय्य लाभले.
कार्यक्रमाला गुरुनाथ गवंडे,सचिन मुळीक, मनिषा सुतार, ललिता पांचाळ,नहानुर शेख, सुप्रिया पांढरे,संपदा पांढरे,दिशा पांढरे,ज्ञानेश्वर पांढरे, श्रावणी मोरजकर, विकास शेटये,वेदिका शेटये आदी पालक मंडळी उपस्थित होती.