सावंतवाडी दि.२८ फेब्रुवारी
पुणे येथे ऑर्कीड हॉटेल मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्षा ची विस्तारित कार्यकारिणी चा आढावा संमेलन पार पडले विशेष म्हणजे महाराष्ट्राचे युवा नेतृत्व संग्राम भाऊ धोकटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला
या कार्यक्रमाचे नियोजन महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सावलाखे आणि पुणे काँग्रेस पूजा आनंद पुणे अध्यक्षा सायली नडे, पिंपरी चिंचवड संगीता तिवारी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा
या पदाधिकारी यांनी केले .या
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिति अखिल भारतीय महिला काँग्रेस् च्या नूतन अध्यक्षा ” अलका लांबा “ज्यांना पदग्रहण करून फक्त ४० दिवसाचा कालावधी झालेला आहे या कालावधीतच त्यांनी २० राज्यांचा दौरा पूर्ण केला आहे
महाराष्ट्र प्रदेश चा सलग दुसरा पक्ष, पक्ष संघटनात्मक चर्चा आणि भारत जोडो न्याय यात्रेतिल महिला साठी महत्वाचे पाच मुद्दे “नारी न्याय हक्क “महिलांचे अधिकार ह्या उपक्रमा चे उद्धघाटन् करण्यात आले हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवण्यासाठी विशेष प्रयत्न अखिल भारतीय महिला काँग्रेस करणार आहे .
प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले.जरी ३३ टक्के महिला आरक्षण असेल तरी ही जिल्ह्यातील चाचपणी करून च विधानसभा उमेदवार दिला जाईल काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त ठिकाणी आपले उमेदवार देईल तसेच काहींना लोकसभा सुद्धा संधी देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्य महिला अध्यक्षा सौ साक्षी वंजारी यांनी आपली संघटनात्मक अडचणी आणि जिल्हा काँग्रेस ची संपूर्ण परिस्थिती मांडली. राजकारणात महिलांना होणाऱ्या समस्या आवर्जून मांडल्या अध्यक्षा अलका लांबा यांनी संघटना वाढीसाठी जी लागेल ती मदत पार्टी करेल तसेच महिला अध्यक्षा ना आवश्यक ते निर्णय घेण्याची मुभा दिली त्याबद्दल सकारात्मक
निर्णय घेण्यास सांगितले. येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्यातून महिला नेतृत्व तयार व्हावं अशी आशा अलका लांबा यांनी व्यक्त केली .कार्यमासाठी अरविंद शिंदे ,तसेच् संग्राम भाऊ व त्यांच्या पत्नी यांचे मोला चे सहकार्य लाभले.