कुसगाव कुडाळ येथील आजारी असलेल्या निराधार वृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकीने दिल जीवदान

0

सावंतवाडी,दि.१३ जानेवारी

कुसगाव कुडाळ येथील आजारी असलेल्या निराधार वृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकीने दिल जीवदान. गेले दोन दिवस भटवाडी येथील लक्ष्मी नारायण मंदिरा समोर आजारी अवस्थेत पडलेल्या कुसगाव येथील जाधव या निराधार वृद्ध व्यक्तीची माहिती सामाजिक बांधिलकीला मिळताच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, शामराव हळदणकर व सुजय सावंत यांनी तेथे धाव घेतली व सदर वृद्ध व्यक्तीला कोरगावकर यांच्या ॲम्बुलन्स मध्ये घालून पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये अ‍ॅडमिट करून जीव वाचवला यासाठी सावंतवाडीचे पोलीस पी.के कदम, संतोष गलोले व कोरगावकर यांचे सहकार्य लाभले. सदर रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला त्याच्या राहत्या घरी कुसगाव येथे सोडण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकीने घेतली आहे.