वेंगुर्ला,दि.२८ फेब्रुवारी
बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन तथा कवी कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. जगभरात ज्या अनेक बोली भाषा बोलल्या जातात त्यांचे जतन, संवर्धन करून एका पिढीपासून दुस-या पिढीपर्यंत ज्ञान देण्याचे कार्य भाषा करत असते. त्याम मातृभाषेतून ज्ञानग्रहण प्रक्रिया सर्वसामान्य ठरली असल्याचे प्रा.सुनिल भिसे यांनी सांगितले. हिदी विभाग प्रमुख प्रा.वसंत नंदगिरीकर यांनी मराठी भाषा व इतर भारतीय भाषांचे महत्त्व सांगितले. मराठी विभागप्रमुख डॉ.पांडुरंग गावडे यांनी सूत्रसंचालन केल. तर आभार प्रा.सदाशिव चुकेवाड यांनी मानले.