वन विभागाने नियमानुसार कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली नसल्याने आंदोलनात नाराजी व्यक्त
आंबोली,दि.२८ फेब्रुवारी
आंबोलीत वन खात्याच्या जमिनीत संगनमताने गैरव्यवहार करून अतिक्रमनास जबाबदार असणाऱ्या वन कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खातेनिहाय चौकशी करा असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी याना दिले होते.पण वन विभागाने नियमानुसार कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली नसल्याने आंदोलनात नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आज उपवनसंरक्षक यांच्याकडे कर्मचारी याला निलंबित करून बडतर्फ करण्याची मागणी आंदोलकांतर्फे सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी अर्जाद्वारे केली आहे.तसेच प्रधान सचिव यांच्याकडे ही मागणी केली आहे.
आंबोली राखीव जंगलात तसेच अनिर्णित क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात बाहेरच्या लोकांचे बंगले रिसॉर्ट्स उभे राहिले आहेत ही कामे वनखात्याच्या संगनमताने झालेली आहेत. यात पूर्णपणे वन विभाग अधिकारी व कर्मचारी भ्रष्ट नीतिमत्ता अवलंबून ही कामे झाली आहेत तसेच यातील दलालांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याला निलंबित करून खातेनिहाय चौकशी करून बडतर्फ करावे अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.