सावंतवाडी,दि.२८ फेब्रुवारी
शहरातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत त्याला विरोध झाला पण सार्वजनिक बांधकाम विभागाने तो जुमानला नाही. पण आज शिवाजी चौक गवळी तिठा येथील आत्ताच घालण्यात आलेले गतिरोधका मुळे डंपरचा चाकाचा नट बोल्ट तुटून स्पीड ब्रेकर शेजारी असलेलं किराणा दुकान श्री नार्वेकर यांच्या दुकानातील बरणीवर येऊन आदळला असल्याची माहिती माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी दिली.
ते म्हणाले, तसेच समोरील स्पीड ब्रेकर सुद्धा धोकादायक होत असून त्या ठिकाणी सुद्धा अनेक मोटर सायकल स्वार पडून अपघात झाले तरी तात्काळ तिन्ही ठिकाणातील गतिरोधक हटवण्यात यावेत. तो नट बोल्ट तुटून चाकाचा पडला असून गेल्या दोन दिवसात अनेक मोटरसायकल वाले त्या गतिरोधकावर पडलेत तर एका टेम्पोतील सिलेंडर खाली पडले उतार असल्याकारणाने गडगडत २५ फुटापर्यंत गेले अनेक अपघात होत आहेत, असे सुरेश भोगटे यांनी सांगितले.
Home आपलं सिंधुदुर्ग गतिरोधकामुळे डंपरच्या चाकाचा सुटलेला नट बोल्ट तुटून स्पीड ब्रेकर शेजारी असलेलं किराणा...