दोडामार्ग, दि. २८ फेब्रुवारी
दोडामार्ग गोवा सीमेवर गेल्या जवळपास वीस दिवसांपासून युपी पासिंग असलेली अपघातग्रस्त कार ही तमरनाईक देवस्थान येथे एका वळणावर कडेला उभी करून ठेवली आहे. या कार मुळे या मार्गावर इतर वाहनाना अडथळा ठरत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ही कार ओढून नेण्यासाठी दोरखंड देखील बांधलेले आहेत. पण नेण्यात आली नाही. गोवा दोडामार्ग डिचोली पोलिस यांनी याची दखल घेऊन रस्ता कडेला असलेली ही कार टोचून करून दोडामार्ग गोवा पोलिस स्टेशन ठिकाणी ठेवावी अशी मागणी केली जात आहे.
गोवा राज्यात काही पर्यटक vp 14 Bv 7579 ही कार घेऊन आले असावे या कारला अपघात झाला असावा यामुळे गेले वीस ही कार गोवा दोडामार्ग सीमेवर तमरनाईक देवस्थान नजीक ठेवलेली आहे. यावर कव्हर झाकले होते. पण वारे तसेच ये जा करणारी वाहने यामुळे या कारवर घातलेले कव्हर खाली पडले आहे.