४ मार्चला दोडामार्ग पंचायत समिती समोर आंबेली ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण

दोडामार्ग, दि. २८ फेब्रुवारी 

झरेबांबर आंबेली ग्रुप ग्रामपंचायत यांच्या ताब्यात असलेल्या आंबेली कोनाळकरवाडी येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणारी नळपाणी योजना गेल्या
काही महिन्यापासून बंद आहे यामुळे ग्रामस्थ यांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. तातडीने पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर आंबेली कोनाळकरवाडी येथील महिला ग्रामस्थ यांनी ४ मार्च रोजी दोडामार्ग पंचायत समिती कार्यालय येथे घागरी घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.