तिलारी घाटातील अवजड वाहने रोखण्यास चंदगड बांधकाम विभाग अपयशी

अवजड वाहनांची संरक्षण कठड्याला धडक सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

दोडामार्ग, दि. २८ फेब्रुवारी

गेल्या काही महिन्यांपासून सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सीमेवर असलेला तिलारी धोकादायक घाट रस्ता मधून होणाऱ्या नियमबाह्य अवजड वाहनांमुळे तिलारी घाट बंद होणे वाहने अडकून पडणे या घटना सतत घडत आहेत. या घाटातील अवजड वाहने रोखण्यास चंदगड बांधकाम विभाग सपशेल अपयशी ठरले आहे. कोणत्याही प्रकारची उपाययोजना किंवा सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळे गोवा राज्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून तिलारी घाटातून राञी एक टेम्पो अवजड सामान भरून घाट उतरून खाली येताना एका धोकादायक वळणावर ब्रेक निकामी होऊन वाहन संरक्षण कठड्याला अडकून राहिले यामुळे मोठी दुर्घटना टळली. तीनशे ते चारशे फुट खोल दरीत हा टेम्पो कोसळता कोसळता वाचला.