‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत ‘राज्यस्तरीय स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा -सन २०२३ -२०२४’ के. जे. सोमय्या कॉलेज, विद्याविहार, मुंबई येथे आयोजित

देवगड,दि. २८ फेब्रुवारी

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत ‘राज्यस्तरीय स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा – सन २०२३ -२०२४’ के. जे. सोमय्या कॉलेज, विद्याविहार, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ‘उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय’ म्हणून आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी प्रथम, श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड द्वितीय, आर्ट्स अडँ कॉमर्स कॉलेज फोंडाघाट तृतीय, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ चौथा, एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण पाचवा क्रमांक प्राप्त झाला.

तसेच श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या डॉ. सुखदा जांभळे यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट प्राचार्य तसेच राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून आणि प्रा. बाळकृष्ण तेऊरवाडकर यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय तालुका समन्वयक म्हणून पुरस्कार दिला गेला.

पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी के .जे.सोमय्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू माननीय डॉ.राजशेखरन पिल्ले ,डॉ.संजय जगताप, उपसंचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,महाराष्ट्र शासन, मा.प्रफुल्ल पाठक ,सेक्रेटरी, सेंट्रल पावर सेक्टर स्किल कौन्सिल, नवी दिल्ली, डॉ. उदय निरगुडकर, मा. श्री बिपिन जगताप, संचालक, खादी व ग्रामोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, डॉ. संजय इंगळे, सहसचिव महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.