देवगड ,दि.२८ फेब्रुवारी
जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेमध्ये स्वर्गीय बापूसाहेब गोगटे पुण्यतिथी व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी. माजी आमदार व विद्या विकास मंडळ जामसंडे चे अध्यक्ष. अजित गोगटे साहेब अध्यक्ष म्हणून लाभले तर प्रमुख वक्ते माजी मुख्याध्यापक अरुण सोमण लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कर्ले . यांनी केले. तर आभार प्रदर्शन. विनायक जाधव केले. विज्ञान दिनानिमित्त शाळेमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली. याचे बक्षीस वितरण श्री. ठाकूर सर यांनी केले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून. ज्येष्ठ विज्ञान शिक्षक सतिशकुमार कर्ले सर यांना अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्कार २०२४ साठी निवड झाल्याबद्दल. संस्था अध्यक्ष अजितराव गोगटे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मराठी विषय शिक्षक . विनायक ठाकूर यांना सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्यामार्फत उत्कृष्ट मराठी शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिकविद्यामंदिर जामसंडे या प्रशालेला तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अजित गोगटे यांचे व माजी मुख्याध्यापक .अरुण सोमण यांनी विद्यार्थी ,शिक्षक यांचा सत्कार केला.



