सावंतवाडी,दि.१३ जानेवारी
पणदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश प्राप्त केले. शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभागात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान विषय शिक्षिका श्रीम. शीतल शशिकांत मोरजकर यांच्या ‘ नेक्स्ट स्टेशन स्पेस मिशन’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला असून या प्रतिकृतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.
श्रीम .शीतल मोरजकर यांनी बनवलेली ही विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे . यासाठी त्यांच्यावर शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी प्रशालेच्या विज्ञान विषयशिक्षिका श्रीम. शीतल मोरजकर यांचे अभिनंदन केले आहे .