नविन विहीर खोदाई साठी २ गुंठे जमीन खरेदीस केली ८ लाख रुपयांची घसघशीत आर्थिक मदत.
आर्थिक मदतीप्रित्यर्थ हसापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने महेश मालक इंगळे व प्रथमेश मालक इंगळे यांचा सत्कार.
अक्कलकोट,दि.०८ ऑक्टोबर
अक्कलकोट तालुक्यातील मौजे हसापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये भीषण पाणी टंचाई भासत होती. यंदाचा पावसाळा समाधानकारक होवूनही अक्कलकोट शहरासारखेच हसापूर गावातही पाणी प्रश्न कायम आहे. हसापूर मधील ही पाणी टंचाई
व पाणी प्रश्न लक्षात घेवून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा मा.नगरसेवक महेश इंगळे यांनी स्वता: पुढाकार घेवून यंदाच्या विजयादशमीच्या शुभ मुहार्तावर नविन विहीर खोदकामासाठी २ गुंठे जमिन घेऊन देण्यासाठी ८ लाख रुपयांची वैयक्तीकरित्या घसघशीत आर्थिक मदत केली. ही आर्थिक मदत आदरणीय प्रथमेश मालक इंगळे यांच्या हस्ते जयवंत जयनंदलाल चव्हाण यांचे मातोश्री रुक्मिणीबाई जयनंदलाल चव्हाण यांना वरील रक्कम तात्काळ सुपूर्द करण्यात आली. महेश इंगळे यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे हसापूर ग्रामस्थांच्या वतीने महेश इंगळे यांच्या प्रती कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या मदतीमुळे हसापूर गावचे पाणी प्रश्न कायमचेच मार्गी लागणार आहे. महेश इंगळे यांच्या या मदतीने ग्रामस्थ अत्यंत भारावले असून त्यांच्या या मदती प्रित्यर्थ व विजयादशमी दसऱ्याचे औचित्य साधून आज मौजे हसापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने महेश मालक इंगळे व आदरणीय प्रथमेश मालक महेश इंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी हसापूर ग्रामपंचायत सरपंच कामाठी, उपसरपंच गौतम घटकाबळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कामाठी, मीनाबाई शिंदे, कृष्णाबाई सदाफुले, सायनत्राबाई घटकाबळे, माजी सरपंच पाटील, रामलिंगया स्वामी, शीतापती कामाठी, राजकुमार कामाठी, महेश कामाठी, रोहित जाधव आदींसह हसापूरचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य गणेश कामाठी यांनी केले, तर आभार उपसरपंच गौतम घटकांबळे यांनी मानले.


