कणकवली दि .२८ फेब्रुवारी(भगवान लोके)
तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय शाळकरी अल्पवयीन मुलीला मिठी मारून तिचा विनयभंग केल्याची फिर्याद पिडीत मुलीने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपी मारुती लक्ष्मण पवार ( वय ३२ , रा. कणकवली ) याच्याविरोधात पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मारुती पवार हा चालक म्हणून काम करत असून त्याने पीडित अल्पवयीन मुलीच्या राहत्या खोलीत मिठी मारून तिचा विनयभंग केला. ही घटना दीड महिन्यापूर्वीची असून याबाबत पीडित मुलीने कणकवली पोलीस ठाण्यात २७ फेब्रुवारी रोजी रात्री फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी मारुती पवार याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करत आहेत.