कणकवलीत रेल्वे स्टेशन मास्तर आणि पोलीसांनी दाखवली तत्परता..

मिठबाव येथील प्रभा नरे यांना पर्समधील लाखो रुपयांचा ऐवज मिळवून दिला ..

कणकवली दि.२८ फेब्रुवारी(भगवान लोके)

मिठबाव येथील प्रभा नरे व कुटुंबीय २७ फेब्रुवारी २०२४ रोजी तुतारी रेल्वेने दादर येथून कणकवली असा प्रवास करत होते.कणकवली स्टेशन आले असता गडबडीत प्रभा नरे या खाली उतरल्या,तेव्हा रेल्वेत लाखो रुपयांचा ऐवज असलेली पर्स सीटवर राहून गेली.रेल्वे गाडी पुढे रवाना झाली,त्यानंतर पर्स सीटवर राहील्याचे लक्षात आले.तातडीने पती कृष्णा नरे यांनी स्टेशन मास्तर यांना कळविल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने ती पर्स ताब्यात घेत नरे कुटूबियांच्या सुपूर्त केली आहे.

त्या पर्स मध्ये ६ तोळे सोनेचे दागिने , मोबाईल व रोख रक्कम १० हजार असे लाखों रुपयांचे साहित्य होते.

तुतारी रेल्वे गाडी मध्ये आपली पर्स राहिल्याचे लक्षात येईपर्यंत रेल्वे निघून गेली होती.त्यानंतर कृष्णा नरे यांनी तातडीने तिकीट कणकवली स्टेशन मास्तर व रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली.त्यानंतर तातडीने संबंधित रेल्वे पोलीस यंत्रणेने सदर पर्स वस्तूसह कृष्णा नरे यांच्या हाती सुपूर्त केली .त्यावेळी नरे कुटुंबीयांनी रेल्वे यंत्रणेचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली .