सेवाभावी वृत्तीचे प्रशांत वतनदार यांचे निधन

मुंबई,दि. ११ ऑक्टोबर

भांडुपगाव ओम् साई डेकोरटचे सर्वेसर्वा आणि परळ साईबाबा मंडळाचे सदस्य प्रशांत रघुनाथ तथा भाऊ वतनदार यांनी दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. मुत्युसययी ते ५८ वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून डेकोरेटर व्यवसायाला सुरुवात केली होती. ते साईबाबांचे निस्सीम भक्त म्हणून परिचित होते. तसेच साईराम या नावाने ओळखले जात होते. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी कित्येकांना सवलत देऊन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घडून आणले. अशाप्रकारे व्यवसाय वाढवून समाजाच्या प्रती आदरभाव निर्माण केला होता. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या अंत्ययात्रेला पनवेल, पालघर,डहाणू, वर्सोवा, अलिबाग भागातून आलेल्या ज्ञाती बांधवांनी सांगितले की, प्रशांत वतनदार यांच्या रूपाने लोकांनी सहकार्य करणारा साईभक्त गमावला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,दोन भाऊ, भावजय, विवाहित बहीणी असा परिवार आहे. त्यांच्यावर भांडुपगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी नरेंद्र पवार, धनंजय म्हात्रे, माजी शाखाप्रमुख दत्ताराम पालेकर आदींनी सहवेदना व्यक्त केल्या.