सावंतवाडी दि.२९ फेब्रुवारी
मराठी भाषा साता समुद्रापार पोहोचली आहे परदेशातही मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी बांधव धडपडत आहेत आणि आपण मराठी आपली भाषा विसरत चाललो आहोत त्यामुळे आता खऱ्या अर्थाने आपली बोली मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी मराठी भाषेची पुस्तके, वृत्तपत्र यांचें सतत वाचन हवे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी भाषेची चळवळ व्यापकतेने वाढेल असे मत ज्येष्ठ कवयित्री कोकण मराठी साहित्य परिषदे नियामक मंडळाच्या पदाधिकारी सौ उषा परब यांनी व्यक्त केले.
माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे मराठी भाषा दिन कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ परब तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच डॉ अर्चना सावंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे तालुकाध्यक्ष अँड संतोष सावंत, अँड नकुल पार्सेकर, उपसरपंच संतोष वेजरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, एस बी सावंत, आर के सावंत, बीएस चौरे ,पोलीस अधिकारी लोकेश कानसे, श्री गुंजाळ, सिद्धेश कानसे ,मीरा कासार ,शीतल सावंत, ग्रंथालय कर्मचारी सौ मधु कुंभार, सौ माया साळगावकर, सौ रोशनी निब्रे ,भरत सावंत, सुनयना कासार, आदी उपस्थित होते
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ परब पुढे म्हणाल्या, मराठी भाषा टिकवण्याच्या दृष्टीने माजगाव ग्रंथालय विविध उपक्रम घेत आहे हे कौतुकास्पद आहे खऱ्या अर्थाने मराठी भाषा आज टिकणे आवश्यक आहे त्यासाठी लिहिते व्हा व्यक्त व्हा तुम्ही दररोज जे काही बोलता वावरता ते लिहीत जा आज मराठी भाषा सातासमुद्रा पार जतन केली जात आहे तिचे संवर्धन होत आहे मग आपणच या मराठी भाषेला आता वाचवायला हवे ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने मराठी भाषा टिकली जात आहे पण शहरी भागात आपणच मराठी भाषेला विसरत चाललो आहोत मराठी भाषा टिकण्यासाठी मराठी संवर्धन व जतन होण्यासाठी आपणच जे जे मराठीत आहे आणि जे जे मराठीसाठी कार्यरत आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करा असे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सरपंच डॉ सौ अर्चना सावंत, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे तालुकाध्यक्ष अँड संतोष सावंत, अँड नकुल पार्सेकर आदींनी ग्रामीण भागातील विद्यार्थी खऱ्या अर्थाने गुणवंत आहेत त्यांच्यामध्ये सुप्त गुण लपले आहेत ते खऱ्या अर्थाने मराठी भाषा टिकत आहेत आज मोबाईलचा सर्रास वापर झाला आहे त्यामुळे वाचन आणि ग्रंथालय कडे वळण्याचे प्रमाण कमी झाले आहे हे जर टिकवायचे असेल तर आता आपण साहित्यिक आणि ग्रंथालयानेच त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
यावेळी निबंध वकृत्व चित्रकला आदी विविध स्पर्धा मध्ये यश मिळवलेल्या स्पर्धकांचा विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन लोकेश कानसे तर आभार प्रदर्शन शितल सावंत यांनी मानले
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने साहित्यिका तथा महाराष्ट्र साहित्य संस्कृती निवड मंडळाच्या उषा परब यांच्या तर्फे पुस्तकांचा संच माजगाव ग्रंथालयाला ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्याकडे भेट म्हणून देण्यात आला .यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.