राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा पर्याय निवडणार – परशुराम उपरकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या नेत्यांसोबत बैठका झाल्या ; अधिवेशन संपल्यानंतर पक्ष प्रवेश होईल

कणकवली दि.२९ फेब्रुवारी(भगवान लोके)

माझ्या सहित कार्यकर्त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विचारणा करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आमच्या समोर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे दोन पर्याय आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समवेत बैठका झालेल्या आहेत.आता अधिवेशन संपल्यानंतर आमचा निर्णय अंतिम होईल. भाजपकडून अद्यापही विचारणा झालेली नाही किंवा आम्हीही भाजपमध्ये जाण्याच्या विचारात नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.