सुरत गुजरात येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत वायंगणकर देवगड खेळाडूंचे घवघवीत यश !

देवगड,दि.२९ फेब्रुवारी
गुजरात सुरत येथे दिनांक २४ व २५ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत जामसंडे येथील वायंगणकर फिटनेस खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले असून वांगणकर व्यायाम शाळा देवगड जामसंडे यांच्या वतीने खेळाडूंच्या गुणगौरव समारंभा निमित्त व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आयोध्या प्रसाद गावकर, जिल्हा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त दयानंद मांगले,गणेश आचरेकर आनंद जाधव व कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग सिंधुदुर्ग चे सचिव संजय साटम, कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग चे सिंधुदुर्ग खजिनदार प्रदीप नारकर ,सदस्य टीना चौगुले,वायंगणकर्स जिमचे मालक गणेश वायंगणकर सदस्य उपस्थित होते.
प्रास्तविक प्रदीप नारकर यांनी करून अधिकाधिक परीश्रम घेऊन ये यश संपादन केलेले आहे यात या जिमचे प्रशिक्षक संजय साटम यांच्या मार्गदर्शनामध्ये यश प्राप्त केले आहे खेळाडूंना खेळाडूंच्या पालकांनी चांगली मेहनत घेतली.
जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे यांनी सध्याचे युग मोबाईलचे आहेत त्यात गुंतून न राहता दररोज व्यायाम करणे महत्वाचे आहे. खेळाडूंनी मिळवले यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. अयोद्ध्या प्रसाद गावकर यांनी खेळाडूने मिळविलेले यश कौतुकास्पद असून पत्रकारितेच्या माध्यमातून वेळोवेळी खेळाचे महत्व लोकांसमोर आणून चांगले आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या जिल्हास्तरीय जेष्ठ आदर्श पुरस्कार प्राप्त दयानंद मांगले यांनी आपल्या मार्गदर्शनात गणेश वायंगणकर आणि संजय साटम यांच्या सारख्या चांगल्या प्रशिक्षकांमुळे मुलांना चांगले यश प्राप्त करता आले आताची पिढी ही संगणक युगात वावरत असताना खेळाकडे शरीर स्वास्थ पाहणे गरजेचे आहे .याकरता प्रत्येकाने फिटनेस ठेवणे महत्त्वाचे आहे. प्राप्त केलेले यश या तालुक्यासाठी आदर्शवत आहे .या निमित्ताने जेवढी प्रसिद्धी देता येईल तेवढे जास्त प्रयत्न करण्याचे आवर्जून नमूद केले. महिला खेळाडू आपले घर कुटुंब संभाळून खेळतात व मार्गदर्शन करतात याबद्दल कौतुक केले. आनंद जाधव यांनी गुरुंच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले असून रात्रंदिवस मेहनत व एकच विचार यामुळे यश प्राप्त झाल्याचे आवर्जून सांगितले. प्रशिक्षक संजय साटम यांनी स्पर्धेची माहिती देत पालकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास तसेच या पुढील काळातही येथील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याची ग्वाही दिली.
यावेळी विजेते गुणवंत स्पर्धक ओंकार कुबडे,सायली घारे यांचा पालकांसमवेत मेडल व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.प्रास्तविक सूत्रसंचालन प्रदीप नारकर,यांनी केले उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे यांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
सुरत येथे झालेल्या स्पर्धेतील यशस्वी गुणवंत विजेते पुढील प्रमाणे.
सब ज्युनियर मुली ५७ किलो वजनी गट वेदा साटम ब्राँझ मेडल, यशस्वी परब गोल्ड मेडल सब ज्युनिअर मुले ५९ किलो वजनी गट श्रेयस धुवाळी ब्राँझ मेडल, आराध्य चौगुले नॅशनल स्पर्धेत सहभाग, सब ज्युनियर मुले ८३ किलो वजनी गट तौसिफ शेख, सिल्वर मेडल ,ज्युनियर मुले ५९ किलो वजनी गट विशाल लाड ब्राँझ मेडल ,जूनियर मुले ७४ किलो वजनी गट, दीप जाधव ब्राँझ मेडल ,मास्टर गट पुरुष ५९, किलो वजनी गट ,गोविंद कळंबटे गोल्ड मेडल ,मास्टर गट पुरुष ७४ किलो वजनी गट, शशांक साटम गोल्ड मेडल याप्रमाणे विजयी ठरले.