सावंतवाडी,दि.२९ फेब्रूवारी
गोवा आरटीओ कडून व ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाडीमालकांना नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास येत आहे. सिंधुदुर्ग (बांदा पत्रादेवी) बॉर्डर येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाता येताना नाहक त्रास सहन करावा गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांचा टि.पी परमिट असल तरी गोवा पोलीस , गोवा आरटीओ यांचा कायमच त्रास होत आहे. त्याचप्रमाणे बांदा पत्रादेवीच्या जवळपास असणाऱ्या गावातील स्थानिक लोकांनाही गाड्या अडवून त्रास देत असल्याचे निदर्शनास येत आहे बांदा येथील बाजारपेठेत घरात लागणाऱ्या जीवनावशक वस्तूंच्या खरेदीसाठी आले तरी या वाहनचालकांना या गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस हे नाहक त्रास देतात. कारण डिंगने , नेतर्डे, डोनगरपाल , गाळेल व आजूबाजूच्या गावातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बांद्याला यावं लागत आणि या प्रवासाला सुद्धा या पोलिसांचा त्रास होत असतो.
या गोष्टीला वेळीच गोवा प्रशासनाने आळा घालावा अन्यथा आम्ही आमच्या आरटीओकडे तक्रार करून गोवा पासिंग गाड्या सिंधुदुर्ग बॉर्डरवर अडवू व जशास तसे उत्तर गोवा प्रशासनास आम्ही देऊ तसेच लवकरच या विषयावर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार जी जी उपरकर यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट घेणार असे बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम(जी.जी) उपरकर समर्थक अंकुश उर्फ नाना सावंत, आदेश सावंत,बाळा बहिरे व पदाधिकारी यांनी दिला