सावंतवाडी दि.२९ फेब्रुवारी
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असाल तर शालेय शिक्षण व भाषा मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या निवासस्थानासमोर उपोषणात बसावे लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे .
सुमारे एक महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आंबोली घाट रस्ता भ्रष्टाचार संदर्भात पत्र देऊनही अधिकाऱ्यांवर कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच हे भ्रष्ट अधिकारी त्याच कार्यालयात बसून कारभार करत आहेत २०२१ ते २०२३ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे १६ कोटी ५६ लाख रुपये खर्च घातलेत याच्या मागील वर्षात प्रचंड खर्च घालूनही हा घाट रस्ता वाहतुकीस खड्डेमय बनला ,घाट कोसळत राहीला .घाटामध्ये ठीक ठिकाणी संरक्षक भिंती कोसळताहेत याबाबत पुराव्यानिशी फोटो सहित सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी श्री किणी यांच्याकडे या संदर्भात तक्रार देऊनही त्याच अधिकाऱ्यांना घेऊन किणी यांचे कामकाज चाललेला आहे असे साळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
श्री साळगावकर म्हणाले,आमच्या पत्राचं साधं उत्तरी देऊ शकलेले नाहीत. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीमागे शिंदे सरकारचं धोरण आहे काय ? याच जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा.रवींद्र चव्हाण या भ्रष्टाचारामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे रवींद्र चव्हाण साहेब याच रस्त्याने अनेक वेळा जातायेत ? हा भ्रष्टाचार आहे यातील अनियमितपणा हा पण भ्रष्टाचारच मानला गेला आहे तसेच या रस्त्याला खड्डे पडले स्वतः शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घाटातील खराब झालेला रस्ता स्वतः अनुभवला आहे.या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत अनेक वाहतूक करताना वाहनांचे नुकसान झालेलं आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हा रस्ता खराब होत आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा ही आमची मागणी आहे सरकारला हे जमत नसेल तर आम्हाला शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या दारात उपोषणाला बसावं लागेल याची गंभीर नोंद इथल्या अधिकाऱ्यांनी शासनाने घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.
सदर प्रश्न विधानसभेमध्ये शून्य प्रहार ला उपस्थित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून काही आमदारांकडे सदर कागदपत्रे पाठविले आहेत तसेच रस्त्याचे फोटोही पाठवलेले आहेत, असे बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.