निरवडे पलतडवाडी जाणार्‍या साकव बांधणे कामाचे भूमिपूजन उपाध्यक्ष प्रथमेश तेली आणि माजी सरपंच सदा गावडे यांच्या हस्ते

सावंतवाडी,दि.२९ फेब्रूवारी

निरवडे पलतडवाडी जाणार्‍या साकव बांधणे कामाचे भूमिपूजन आज भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश तेली आणि माजी सरपंच सदा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि माजी आमदार राजन तेली,विनोद राऊळ यांच्या प्रयत्नातून साकव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने भाजपा सरचिटणीस प्रमोद गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी सरपंच सुहानी गावडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर माजी सरपंच प्रमोद गावडे बाबुराव गावडे भगवान गावडे नामदेव गावडे मधुसूदन गावडे महेंद्र गावडे संदीप पांढरे आनंद गावडे नयनेश गावडे गुरुदास गावडे उमाकांत गावडे आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि माजी आमदार राजन तेली,नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या प्रयत्नातून भाजपा सरचिटणीस प्रमोद गावडे यांच्या पाठपुराव्यामुळे निरवडे पलतडवाडी जाणारा साकव मंजूर करण्यात आला आहे. त्याचा निधी प्राप्त झाला आहे.त्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.