दोडामार्ग,दि. १७ आॅक्टोबर
आंबेली देऊळवाडी येथील रहिवासी अरुण उर्फ राजू पवार यांची एक वर्षे दोन महिन्यांची बालिका ओजस्वी अरूण पवार हिचे शुक्रवारी गोवा मेडिकल कॉलेज मध्ये उपचार सुरू असताना दुपारी तिचे निधन झाले. निमोनीयाने आजारी होती. सायंकाळी तिचा मृतदेह आंबेली गावात आणण्यात आला तेव्हा तिच्या सोबत खेळणाऱ्या लहान मुली तसेच कुटुंब याना अश्रू अनावर झाले. तिच्या निधनामुळे आंबेली गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोन महिन्यापूर्वी तिचा वाढदिवस देखील साजरा केला होता. काही दिवसांपूर्वी तिला निमोनीया आजाराची लागण झाली होती.
तिला उपचारासाठी दोडामार्ग मध्ये दाखवले होते. तेव्हा तिला पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज मध्ये पाठवले होते. तेथे अठरा दिवस उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता तिचे निधन झाले. तिच्या पश्चात एक दोन अडीच वर्षाची बहिण आई वडील असा परिवार आहे. तिचे वडील डायव्हर म्हणून गाडीवर चालक आहे. तिच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी मोठी गर्दी केली होती


