मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने १७ मार्च ते २४ मार्च या कालावधीत
मालवण,दि.२९ फेब्रुवारी
मालवण कुडाळ तालुक्यातील नावाजलेली एकमेव लेदर बॉल लीग पद्धतीची क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने १७ मार्च ते २४ मार्च या कालावधीत टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर मालवण प्रीमियर लीग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा (पर्व सातवे) आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या संघाला ५५,५५५ रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला ३३,३३३ रुपये व चषक दिला जाणार आहे. अशी माहिती मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व क्लबचे उपाध्यक्ष गौरव राजेंद्र लुडबे यांनी प्रसिद्धपत्रद्वारे दिली आहे.
या स्पर्धेमध्ये सर्व संघातील खेळाडूंची निवड प्रक्रिया लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंनी प्रवेश अर्ज भरायचे आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून प्रवेश अर्ज भरायची अंतिम तारीख ०५ मार्च आहे. प्रवेश अर्ज मॉन्जिनीस केक शॉप, भरड नाका, मालवण येथे उपलब्ध आहेत. तरी अधिक माहितीसाठी गौरव लुडबे 9420890110, सौरभ ताम्हणकर 7588564887, सुशील शेडगे 7499955147 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.