सावंतवाडीतील घटना; पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या करीत रास्ता रोको

सावंतवाडी,दि. २९ फेब्रुवारी
सावंतवाडी येथील खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी गुंतवणूकदारांनी धडक देत आपले पैसे परत मिळावेत या मागणीसाठी तेथील अधिकारी यांना चोप देत चांगलेच धारेवर धरले. या घटनेमुळे कायदा वं सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला मात्र काही वेळातच पोलीस त्यां ठिकाणी दाखल झाले परंतु गुंतवणूकदार यांनी पोलिसांची ही गाडी अडवत जोपर्यत आमचे पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत अधिकारी यांना सोडणार नाही अशी भूमिका घेतली.

अखेरीस पोलीस ठाण्यात गुंतवणूकदार, कंपनीचे अधिकारी यांची प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी बैठक घेत ग्रहकांचे पैसे तातडीने देण्याच्यां सूचना केल्या त्यानंतर हे प्रकरण तडजोडीने थांबविण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
सावंतवाडी सालईवाडा भागात कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतो असे सांगून कार्यालय थाटलेल्या एका खाजगी फायनान्स कंपनीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. यात कित्येक ठेवीदार गुंतवणूकदार, ग्राहक यांनी सभासद होत आपले पैसे गुंतवले आहेत.मात्र गेली महिनाभर कंपनी वं गुंतवणूक दार यांच्यात पैसे, ठेवी परत देण्यावरून संघर्ष सुरु असून गुंतवणूकदार यांनी एकाच वेळी आपले पैसे परत मागितल्यामुळे त्यां खाजगी फायनान्स कंपनीचें धाबे दणाणले आहेत. तर गुरुवारी आपले पैसे देण्यात येतील असे आश्वासन कंपनीने दिल्यामुळे कार्यालयाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार उपस्थित राहिले होते.परतू पैसे परत देण्यास कंपनीचे अधिकारी असक्षम ठरल्यामुळे ग्राहकांचा पारा अधिकच चढला पैसे न मिळाल्यामुळे गुरुवारी गुंतवणूकदार यांनी पुन्हा संतप्त होत कंपनीच्या सावंतवाडी येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी अधिकारी यांनी समाधान कारक उत्तरे न दिल्यामुळे ग्राहकांनी त्यांना मारहाण केली.यावेळी कायदा वं सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असताना काही वेळाने पोलीस त्यां ठिकाणी दाखल झाले वं त्यांनी कंपनीच्या दोन्ही अधिकाऱ्याना ताब्यात घेत गाडीत बसविले मात्र त्यानंतर आणखीनच संतप्त झालेल्या ग्राहकांनी पोलिसांची गाडी रोखून धरत त्यां ठिकाणी ठिय्या धरला.जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही गाडी जाऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वांनी घेतली. त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारी देण्याचे आवाहन पोलीसानी गुंतवणूकदार यांना केले. संबंधितावर गुन्हे दाखल करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. मात्र तरीही ग्राहकांचे समाधान झाले नाही उशिरापर्यंत या प्रकारावर रास्ता रोको सुरूचा होता. लोक रस्त्यातच बसत होते त्यामुळे काही काळ ट्रॅफिकचा प्रश्न ही निर्माण झाला.
यावेळी संतप्त झालेल्या ग्राहकांनी त्यां अधिकाऱ्यांची शहरात धिंड काढण्याचा निर्णय घेतला परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करीत तो रोखला. यावेळी पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेत त्यांना गाडीत बसवले असता त्यांच्या विरोधात तक्रार नाही मग त्यांना ताब्यात का घेता, असा जाब विचारत आमचे पैसे परत कोण देणार असा सवाल ग्राहकानी केला. अखेरीस प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी पोलीस ठाण्यात ग्राहक वं कंपनीचे अधिकारी यांची बैठक घेत लवकरात लवकर ग्राहकांचे पैसे परत देण्याच्या सूचना केल्या तर याबाबत कोणाचीही तक्रार असल्यास ती कायदेशीर रित्या देण्यात यावी त्यानुसार संबंधित यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असे सांगितले मात्र उशिरा पर्यत कोणीही तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी उशिरा पर्यत कोणावरही गुन्हे दाखल केले नाही. या सर्व घटनेमूळे सालईवाडा भागात बराच काळ कायदा वं सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता तर सार्वजनिक शांतता ही भंग झाली होती त्याबद्दल पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.