कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी रवी माने यांची निवड

तळेरे,दि. २९ फेब्रुवारी

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी रवी माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या कुडाळ तालुकाध्यक्ष म्हणून रवी माने यांची नव्याने नियुक्ती करण्यात आल्याने आरटीओ निरीक्षक संदीप भोसले यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष निवडीबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी आरटीओ निरीक्षक श्री.चव्हाण, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर उपस्थित होते.