‌‌दर्याचा राजा दिवाळी अंकाचे प्रकाशन व कवी संमेलन थाटात संपन्न.

 

मुंबई,दि.२३ ऑक्टोंबर
आजच्या दिवशी पुस्तकाच्या प्रांगणात दर्याचा राजा १८ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन होत आहे याचा मला अतिशय आनंद आहे तथापि दिवाळी अंकाची परंपरा जोपासली जात आहे सध्याच्या परिस्थितीत दिवाळी अंक काढणे आणि स्पर्धेत टिकून राहणे ही सोपी बाब नव्हे मराठी दिवाळी अंकांना थोर परंपरा असून कथा, काव्यांगण, भक्ती पर, मत्स्य विभाग, विशेष लेख, वात्रटिका, आरोग्य यांचा अंकात समावेश करण्यात आल्याने एक दर्जेदार दिवाळीच्या अंकात दर्याचा राजाने स्थान निर्माण केले आहे असे प्रसिद्ध साहित्यिक ज्येष्ठ संपादक आदरणीय अशोक बेंडखळे यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर येथे आयोजित प्रकाशन प्रसंगी प्रतिपादन केले

प्रारंभी दर्याचा राजा दिवाळी अंकाचे संपादक माननीय पंढरीनाथ तामोरे यांनी 18 वा अंक आपल्या हाती घेताना आजवर अनेक मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते प्रकाशन झाले असून त्यांचा आशीर्वादांच्या जोरावर ही परंपरा टिकून असल्याचे नमूद केले

यावेळी पत्रकार श्रीकांत आंब्रे, भरत राऊत, निळकंठ रेवदंडकर उपविभाग प्रमुख अभय तामोरे वसंत तांडेल, मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर, प्रकाश वैद्य, जगन्नाथ पाटील, सौ सोनाली जगताप, जयश्री चौधरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन सहसंपादक प्रमोद कांदळगावकर यांनी केले यावेळी डॉक्टर सुनील सावंत, संतोष खांडे, अशोक बेंडखळे, पंढरीनाथ तामोरे, सोनाली जगताप, जयश्री चौधरी, श्रीकांत आबरे, अजय शिंदे, कमलाकर राऊत, आदींनी कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कवी संमेलनाचे सूत्रसंचालन संतोष खांडे यांनी केले.