मच्छीमारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी झाली सकारात्मक चर्चा
कणकवली दि.२९ फेब्रुवारी( भगवान लोके)
आमदार नितेश राणे आणि देवगड येथील मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांनी मत्स्य मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार यांची आज विधान भवनात भेट घेतली. यादरम्यान मच्छीमारांच्या डिझेल परताव्यासह अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. डिझेल परतावा राज्य सरकारच्या वतीने ३१ मार्च पर्यंत देण्यासाठी यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी देवगड फिशरमेन्स सोसायटीचे चेअरमन द्विजकांत कोयंडे,संचालक उल्हास मंचेकर, सचिन कदम, सचिव उमेश कदम, तारामुंबरी मच्छीमार व्यावसायिक सोसायटीचे माजी संचालक जितेंद्र उपरकर, व्यवस्थापक प्रदीप मुणगेकर आदी उपस्थित होते. यावेळी मच्छीमारांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली आणि हे प्रश्न सोडविण्यावरही भर देण्यात आला.