देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने महिला बचत गट निर्मित खाद्य महोत्सव व महिला मेळावा
देवगड,दि.२९ फेब्रुवारी
आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असून महिला घराच्या बाहेर पडते तेव्हा सुरक्षितची जबाबदारी त्या महिलेची असते अशावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. देवगड तालुक्यातील बचत गटातील महिला या प्रामाणिक काम करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहे या महिलांनी आपली स्वतःची त्याचबरोबर कुटुंबाची ही आरोग्य दृष्ट्या काळजी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन देवगड महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य सुखदा जांभळे यांनी देवगड येथे नगरपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या महिला बचत गट उत्पादन खाद्य महोत्सव तसेच महिला मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्यात बोलताना केले.
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने महिला बचत गट निर्मित खाद्य महोत्सव व महिला मेळावा तसेच अंगणवाडी ५%राखीव निधी टक्के अनुदानातून वॉटर फिल्टर वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त आयोजित केलेल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य सुखदा जांभळे तसेच नगराध्यक्ष साक्षी प्रभू उपनगराध्यक्ष मिताली सावंत मुख्याधिकारी सुरज कांबळे करं निर्धारण अधिकारी रोहित पाटील नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, स्वरा कावले ,मनीषा जामसंडेकर, अन्नपूर्णा स्वयं सहाय्यता बचत गटाच्या संचालिका उषकला केळुस्कर नगरसेवक शरद ठुकरुल विश्वामित्र खडपकर उपस्थित होते. सोहळ्याच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यानंतर खाद्य महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष साक्षी प्रभू उपनगराध्यक्ष मिताली सावंत मुख्याधिकारी सुरज कांबळे व अन्य नगरसेवक नगरसेविकांच्या उपस्थितीत करण्यात आले. आकर्षक रांगोळी काढलेल्या महिलेचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच बचत गटांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .या निमित्ताने उपनगराध्यक्ष मिताली सावंत,नगरसेविकास तन्वी चांदोस्कर मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी उपस्थित महिला मार्गदर्शन केले यापुढे बोलताना सौ जांबळे म्हणाल्या ,आजच्या काळात मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्यांच्या वर समान संस्कार होणे गरजेचे असून मुलींवर लादण्यात येणारी बंधने त्यांच्यावर करण्यात येणारे संस्कार पद्धतीत बदल करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तरच या पुढील काळात आपल्या मुलीला अथवा सुनेला सहज सुलभ पणे कुटुंब कुटुंबाची प्रगती करता येईल .महिला सक्षमीकरण महत्त्वाचे असून या सक्षमी करण्याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करीत असताना ते संस्कार पद्धती समाजापर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे असे सांगून या पुढील काळात जगावर राज्य करण्याचे कर्तृत्व महिलांच्या हाती असून महिला वर्गानी त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणी आवश्यक आहे असे त्यांनी शेवटी सांगितले
या सोहळ्यात महिला बाल कल्याण समिती ५% राखीव निधी अंतर्गत देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील अंगणवाडी याना वॉटर फिल्टर चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सूत्र संचलन प्रास्तविक अस्मिता जाधव यांनी केले.