साडवली येथील सौ.सुप्रभा त्रिभुवने यांचे निधन

देवरुख,दि.२४ ऑक्टोबर
साडवली कासारवाडी येथील दत्तात्रय त्रिभुवने (गुरुजी) यांच्या पत्नी व देवरुख एस टी आगारातील वाहतुक नियंत्रक संतोष त्रिभुवने यांच्या मातोश्री सौ. सुप्रभा दत्तात्रय त्रिभुवने (बेबीताई) वय वर्षे ८३ यांचे शुक्रवार दिनांक २४ आक्टोबर २०२५ रोजी सकाळी नऊच्या दरम्यान वार्धक्याने निधन झाले .

त्यांच्या पश्चात पती , मुलगा ,३ मुली, सुन नातवंडे असा मोठा परीवार आहे . सौ बेबीताईंच्या दुख:द निधनाने साडवली परीसरात शोककळा पसरली आहे.