आंबोली हिरण्यकेशी पेरीचे भाटले येथील अतिक्रमण प्रकरणी वीज विभागाने वीज कनेक्शन तोडले

आंबोली हिरण्यकेशी पेरीचे भाटले येथील अतिक्रमण प्रकरणी पंधरा दिवस पूर्ण होऊन साखळी उपोषण सुरू

आंबोली,दि.२९ फेब्रुवारी
आंबोली हिरण्यकेशी पेरीचे भाटले येथील अतिक्रमण प्रकरणी वीज विभागाने वीज कनेक्शन तोडले. मात्र आज पंधरा दिवस पूर्ण होऊन साखळी उपोषण सुरू आहे.
आंबोली येथील पेरीचे भाटले येथे १५ फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू आहे. खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह भेट दिली होती.
दरम्यान आज वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. आणि वीज जोडणी आज तोडण्यात आली. आज विश्व हिंदू परिषद चे सावंतवाडी चे लक्ष्मीकांत कराड,सुनील सावंत,गौरव शंकरदास,दिनेश गावडे यांनी भेट दिली. हिरण्यकेशी येथील तीर्थक्षेत्र आणि स्वयंभू गणेश मंदिर येथील ही पावित्र्य धोक्यात आहे शासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा. १५ फेब्रुवारी पासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे.
आज याठिकाणी मनोहर गावडे, झिला गावडे, प्रथमेश गावडे,सुनील गावडे,संजय गावडे,रामा राऊत,प्रवीण राऊत,संजय परब,शीतल गावडे, सत्वशीला गावडे,सुलोचना गावडे, सानिका परब,किरण राऊत,कविता राऊत,क्रांती गावडे, सुरेखा गावडे ,जिजाबाई सावंत,शंकर गावडे, राकेश अमृस्कर,दीपक मेस्त्री,अरुण राऊत,नाना जाधव, आदी ग्रामस्थ याठिकाणी उपोषणाला होते.

आज माऊली मंदिर येथे संबंधित बांधकाम अतिक्रमण केलेल्या व्यक्तीने तसेच जमिनीची मध्यस्ती केलेल्या व्यक्तीने आज समाविष्ट असलेल्यानी देवळात अभिषेक घातला.ही बातमी समजताच त्याठिकाणी उपोषण असलेले गावकर मंडळी आली त्यांनी संबंधितांना मंदिरातच त्यांची ‘आरती’ केली. हिरण्यकेशी आणि लिंगाचे मंदिर येथेही अभिषेक पुरोहितला घेऊन करण्यात आला.चार व्यक्ती उपस्थित होत्या.दरम्यान या प्रकाराबाबत गावात सगळीकडे चर्चा असून ग्रामस्थनी संताप व्यक्त केला आहे.यावेळी मनोहर गावडे यांनी याबाबत संबंधितांना खडसावले तसेच आणखी ग्रामस्थ जमा होताच त्यानी पेढे ठेऊन पळ काढला.
दरम्यान उपोषण स्थळी देवदेवस्की भानामती करून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला.तांत्रिक करणी प्रकार असुन उपोषण कर्त्या महिलांनी हिरव्या कापडात लिंबू फुल आणि करणी प्रकार जाळून टाकला.दरम्यान आज ग्रामस्थानी जिल्हाधिकारी यांना आंदोलन संदर्भात पुन्हा पत्र दिले आहे.