देवगड,दि. २९ फेब्रुवारी
पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कॉम्प्यूटर सायन्स hackathon स्पर्धेत जि.प.केंद्रशाळा कुणकेश्वर नं 1 चे दिमाखदार यश -विद्यार्थ्यांनी बनवले स्वतःचे Life Saving Device
शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन,Amazon future engineer,Leadership for equity and code to enhance learning यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय राज्यस्तरीय कॉम्पुटर सायन्स hackathon उत्सव २१ ते २३ फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथील amazon development centre विमान नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
पहिल्या टप्प्यात राज्यातील २३००० विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सहभाग घेतला होता.यापैकी unplug व plug hackathon जिल्हास्तरावर घेवून ४२ विद्यार्थी राज्यस्तरासाठी निवडले गेले.
राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी mBlock software चा वापर करून तसेच physical computing वापरून स्थानिक समस्येवर उपयुक्त असे उपकरण बनवायचे होते.यात केंद्रशाळा कुणकेश्वर नं १ च्या विद्यार्थ्यांनी -देवगड भागामध्ये १८ ते ३० वयोगटातील पर्यटकांचे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याचे प्रमाण वाढत आहे.ही स्थानिक समस्या घेवून Bezzie Buzzer हे Life saving device बनवले.हे device समुद्रकिनारी बसवता येईल यावर समुद्रकिनारी सुरक्षित ठिकाणी पर्यटक असतील तेव्हा ग्रीन सिग्नल लागेल आत खोल गेल्यास रेड सिग्नल लागेल व buzzer चा आवाज येईल संकटकाळी मदतीकरिता सुरक्षारक्षक लगेचच येतील.
उत्तम सादरीकरण,उत्तम प्रात्यक्षिक, उत्तम कोडींग व स्थानिक समस्या सोडविण्यासाठी चिमुकल्यांचे प्रयत्न यामुळे केंद्रशाळा कुणकेश्वर नं १ ची राज्यात top 10 शाळात निवड झाली असून विद्यार्थ्यांना amazon co.पुणे शाखेचे प्रमुख अनिकेत नातू सहसंचालक SCERT.शोभा खंदारे ,जिल्हा शिक्षणाधिकारी पुणे मा.संध्या गायकवाड ,वरिष्ठ अधिव्याख्याता डायट संगमनेर ,,अक्षय कश्यप ,LFE चे CEO यांच्या उपस्थितीत व .इरफान ललानी CEO code to enhance learning यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.त्यांना 1 laptop ,3tab व रोख रक्कम या स्वरुपात बक्षीस प्राप्त झाले.
अमाप फी घेवून साचेबद्ध शिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थापेक्षा ग्रामीण भागातील जि,प.शाळेतील विद्यार्थ्यांनी भविष्यवेधी शिक्षणाचा वेध घेत केलेली ही कामगिरी विद्यार्थ्यासह पालकांचा आत्मविश्वास वाढविणारी ठरत असून सर्वत्र कौतुकाचा विषय बनली आहे.तसेच scratch,mblock यासारखे कोडींग software विद्यार्थ्यांना शिकवणारी शाळा कुणकेश्वर नं १ ही जिल्ह्यातील एक अग्रणी शाळा बनली आहे.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी वैदेही हेमंत वातकर,रितू आनंद सावंत,महिका दीपक घाडी यांना mblock चा वापर करून physical computing च्या सहाय्याने विविध device बनविण्याचे मुलभूत मार्गदर्शन प्रशालेच्या शिक्षिका तृप्ती आरोलकर/नारकर यांनी केले.तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया सनये व पदवीधर शिक्षिका अमृता पाटील .तात्या लवटे,श्रीम.घाडी,श्रीम.धुरी यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेच्या वतीने तसेच सरपंच ग्रामपंचायत कुणकेश्वर .महेश ताम्हणकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास तेली ,उपाध्यक्ष आनंद हिर्लेकर व सर्व शाळा व्यवस्थापन सदस्य , ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कॉम्प्यूटर सायन्स hackathon स्पर्धेत जि.प.केंद्रशाळा कुणकेश्वर नं...