आचरा,दि.२९ फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
नारिंग्रे येथील भावे यांच्या निवासस्थानी रविवार ३मार्च रोजी १४६वा शेगाव निवासी गजानन महाराज प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे ५.३०पासून विजय ग्रंथ पारायण ,दुपारी १०.४५ ते १२.४५ महाराजांची महापूजा, अभिषेक , लघुरुद्र,महाआरती, दुपारी महाप्रसाद सायंकाळी तिर्थप्रसाद, रात्री साडेनऊ वाजता बुवा रामचंद्र चोपडेकर श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वाडा विरूद्ध बुवा आनंद जोशी श्री महाडेश्वर प्रासादिक भजन मंडळ नाडण बुवा श्री आनंद जोशी यांच्या भजनाचा जंगी सामना होणार आहे तरी भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन नारिंग्रे येथील भावे परिवाराकडून करण्यात आले आहे