कोकण झोनच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचा संघ विजेता

वेंगुर्ला,दि.२६ ऑक्टोंबर (प्रथमेश गुरव)
मुंबई विद्यापीठ कोकण झोन ४ (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड) व्हॉलिबॉल स्पर्धा गर्डा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लेवल खेड-रत्नागिरी येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने उपविजेते पद प्राप्त केले.
या संघातील खेळाडू चैतन्य क्षारबिद्रे (कर्णधार), प्रतिक बोवलेकर, मिलरॉय फर्नांडिस, अनिश गावडे, अॅस्टीन डिसोजा, जनार्दन सावंत, अंकुश कलगुंटकर, सुयश वालावलकर, विजय पालकर, विशाल परब, नित्यानंद वेंगुर्लेकर, दत्तराज कामतेकर या सर्वांचे प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी व संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले. यावेळी क्रीडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, जिमखाना चेअरमन प्रा.डॉ.कमलेश कांबळे, प्रा.दिलीप शितोळे, प्रा.डी.बी.राणे, संभाजी पाटील, प्रा.व्ही.पी.देसाई, एस.एच.माने, प्रा.वासुदेव गावडे, प्रा.हेमंत गावडे, सॅमसन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
खेळाडूंना शिक्षण पसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा.डॉ.मंजिरी मोरे-देसाई, पेट्राॅन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.