वेंगुर्ला,दि.२६ ऑक्टोंबर (प्रथमेश गुरव)
उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश तालुकाध्यक्ष पप्पू परब, माजी सरपंच देवेंद्र डिचोलकर, मनवेल फर्नांडिस यांच्या प्रयत्नातून झाला आहे.
पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये उभादांडा ग्रामपंचायत माजी सदस्य शिवाजी पडवळ, सदस्य निरंजन साळगावकर यांच्यासह जयेश नवार, अमित नाईक, दिपक काळसेकर, विठोबा काळसेकर, प्रसाद काळसेकर, लक्ष्मीकांत काळसेकर, गुरूनाथ अणसूरकर, विलास मेस्त्री, कैलास रेडकर, संदिप कोनाडकर, महादेव कोनाडकर, उमेश कोनाडकर, भक्तप्रल्हाद कोनाडकर, आनंद अणसूरकर, मनोहर अणसूरकर, आकाश रेडकर, प्रकाश अणसूरकर, दिलीप अणसूरकर, शुभम अणसूरकर, आलेश करलकर, रवींद्र आजगांवकर, घनःश्याम अणसूरकर, प्रमिला कांबळी, प्रविण तांडेल, सीमा नवार, भाग्यश्री नवार, प्रज्योत कांबळी, अशोक कांबळी, शंकर कांबळी, उमेश कांबळी, यश कांबळी, नंदकिशोर कांबळी, मनोहर कांबळी, सौरभ कांबळी, सलिल कांबळी, महोदव तांडेल, उल्हास तांडेल, प्रविण तांडेल, प्रसाद शिरोडकर, मिथेश शिरोडकर, प्रशांत बोवलेकर, संजय बोवलेकर, विनायक माणगांवकर, दामाजी नवार, ओंकार नवार, सजिन नवार, महादेव नवार, भालचंद्र नवार, साबाजी नवार, हेमंत वेंगुर्लेकर, रमेश वेंगुर्लेकर यांचा समावेश आहे.
याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शक्तिकेंद्र प्रमुख सायमन आल्मेडा, जिल्हा युवा उपाध्यक्ष हेमंत गावडे, बूथ अध्यक्ष नामदेव सरमळकर, संजय मळगांवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


