न्हावेली येथे एसटी बस व बोलेरो टेम्पोची समोरासमोर धडक

प्रवासी सुखरूप; अरुंद रस्त्यामुळे अपघात

सावंतवाडी,दि.२६ ऑक्टोंबर

तालुक्यातील न्हावेली तिठ्यावर आज दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बस व बोलेरो मालवाहतूक टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.

न्हावेली-आरोस मार्गावरून सावंतवाडी-आरोंदा एसटी बस (क्र. MH 20 BL 2957) प्रवास करत असताना, आरोसहून सावंतवाडीच्या दिशेने येणारा बोलेरो टेम्पो (क्र. MH 07 AJ 1040) याच्याशी बसची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

प्रवासी सुखरूप असून, अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अरुंद रस्ता हा अपघाताचे मुख्य कारण असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक गावकऱ्यांनी दिली.