प्रमोद हर्यान बुवा शिष्य मंडळाचे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

 

तळेरे,दि.२७ ऑक्टोंबर

देवगड तालुक्यातील धालवली गावचे सुपुत्र महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा श्री. प्रमोद हर्याण बुवा शिष्य मंडळाच्या वतीने जॉली उत्सव मंडळ, बी डी डी चाळ नं, लोअर परेल डिलाईल रोड यांच्या सहकार्यातून रविवार दि २६ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात सुमारे ९० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला.

यावेळी शिवसेना (उ.बा.ठा.) शाखाप्रमुख श्री. दिपकजी बागवे,शाखाप्रमुख श्री.गोपाळ खाडये, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख श्री.विजयानंद पेडणेकर तसेच बुवा भगवानजी लोकरे, व्यंकटेश राणे, नाथा बुवा सावंत, संतोष टक्के, संतोष शितकर, बाबाजी कानडे, महेंद्र घाडीगावकर, सागर सावंत, तेजस राजेंद मेस्त्री, सुंदर टक्के, राकेश मिशाळ, क्रिष्णा धुरी, जनार्दन सावंत, गणेश जांभळे, सत्यवान राणे, संतोष भोगले, सतिश कार्लेकर, उमेश नारकर, केशव बसवत, उमेश सावंत प्रमोद सखे, प्रथमेश घाडीगावकर, सुरेंद्र पाळेकर, योगेश पांचाळ, आदिंसह हर्यान बुवा शिष्य परिवारातील अनेक सदस्य व रक्तदाते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. प्रमोद हर्यान म्हणाले की, कोणत्याही सामाजिक कार्यात सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता अधिकाधिक रक्तदान शिबीरे होणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस वाढते अपघात, शस्त्रक्रिया, बाळंतपण, रक्तजन्य विकार यासाठी रक्ताची अत्यंत गरज असते. त्यासाठी सर्वदूर रक्तदान चळवळ उभी रहाणे आवश्यक आहे.जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतो तसंच आपलं रक्तही कुणाला तरी जीवदान देऊ शकतो, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे.

रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी बुवा प्रमोद हर्यान यांनी उपस्थित रक्तदाते व मान्यवरांचे आभार मानले.