मुंबई,दि.२७ ऑक्टोंबर
तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्था, मुंबई ही शंभरी पार केलेली शैक्षणिक आजवर सहाय्यक संस्था गावातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना बिनव्याजी परतफेडीच्या तत्त्वावर कार्यरत असलेली संस्था असा लौकिक संपादन केला आहे. असे अध्यक्ष श्री. गोपाळ कृष्ण नागेश तथा बाबा मुणगेकर यांनी पराग हायस्कूल, भांडुप पश्चिम येथे आयोजित १०३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी संस्थेचे चिटणीस हरिश्चंद्र कोचरेकर यांनी प्रास्ताविक मधून संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. बाबा मुणगेकर पुढे म्हणाले की, बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी उत्तम दर्जेदार शिक्षण घेऊन स्वतः बरोबरच संस्थेचा नावलौकिक करावा तसेच संस्थेचा शतकपूर्ती महोत्सव व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. जे. आर. केळुसकर यांनी मौलिक सूचना केल्या. त्यावेळी सत्यवान सरवणकर, गणपत सादये, ऍडव्होकेट राज कुबल, पा. वा. पराडकर, प्रमोद कांदळगावकर, प्रकाश मोंडकर, प्रदिपकुमार सारंग आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी कै. वामन महादेव मुणगेकर, कै. वासुदेव रामचंद्र कोमुर्लेकर यांच्या स्मरणार्थ ठेवलेली पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी तांबळडेग ग्रामसेवा संस्थेचे अध्यक्ष तुकाराम तथा नाना मोंडकर, संस्थेचे अध्यक्ष विलास कुबल, पांडुरंग कुमठेकर, प्रविण सनये, सौ. शर्वरी धावडे, रिया राज कुबल आदी मान्यवर उपस्थित होते. सदर सर्वसाधारण सभा यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष चंद्रकांत कोळंबकर, खजिनदार दत्तात्रय धावडे, सचिन जोशी, संजय जोशी यांनी परिश्रम घेतले. सभेचे सूत्रसंचालन उपचिटणीस सुबोध येरम यांनी केले.


