होय,रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपाच लढवणार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मित्र पक्षांना ठणकावले; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं ट्विट…

कणकवली दि.२९ फेब्रुवारी(भगवान लोके)

भाजपाचे नेते नारायण राणे यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर हक्क सांगितला आहे. यासंबंधीचे ट्विट त्यानी आपल्या ट्विटर अकाऊंट एक मेसेज टाकला आहे त्यात त्यानी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपाची असल्याचे म्हटले आहे. एकीकडे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेच्या त्यामुळे शिवसेनेकडून आपले ज्येष्ठ बंंधु किरण सामंत यांच्यासाठी इच्छुक असल्याचे रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या जागेवरुन पुन्हा मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच पाहयला मिळणार आहे

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंयांनी आपल्या ट्विटमधेय म्हटले आहे की, लोकसभेची निवणूक लवकरच जाहीर होईल विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाववत आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जतना पार्टीची असून भारतीय जनता पार्टीच ही जागा लढवणार आहे. राणेंच्या या ट्विटमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. .