तळेबाजार पंचक्रोशीतील विकास कामांचे भूमिपूजन आम.नितेश राणे यांच्या उपस्थितीत

0

देवगड,दि.१३ जानेवारी
तळेबाजार पंचक्रोशीतील तीन कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले

पंचवीस पंधरा योजनेतून तळेबाजार निपाणी देवगड रोड ते नंदू मांजरेकर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. काजरघाटी बंदर प्रदिप लब्दी घर ते हरिहरेश्वर मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.आ.नितेश राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री पावणाई मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
या कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, गणेश लाड,पंकज दूखंडे तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, बाळ खडपे, माजी सभापती सदानंद देसाई भाजपाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते