सावंतवाडी,दि.२८ ऑक्टोबर
सावंतवाडी तालुक्यात गेले ८ दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे भात शेती कापणीच्या दरम्याने पावसाने वादळीवाराने थैमान घातल्यामुळे पूर्णता भात शेती पाण्याखाली गेलेली आहे तसेच आपले कृषी अधिकारी मंडळ आहेत त्या ठिकाणच्या मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक अधिकारी यांना प्रत्येकी गावात जाऊन भात शेतीचे पंचनामे करण्याच्या आदेश आपण आपल्या स्तरावर द्यावे तसेच सन २०१९ पासून चे पंचनामे केलेले आहेत त्यांची नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळालेली नाही ती तातडीने जमा करा अनेक शेतकऱ्यांनी सोसायटीची कर्ज काढून बी बियाणे, खते खरेदी करून भात शेती केलेली आहे परंतु अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे मडुरा,कास,सातोसे भागात हत्तीने भातशेतीचे नुकसान केले आहे त्यामुळे कापणी लांबणीवर पडली. काही ठिकाणी भात शेतीला पुन्हा कोंब फुटल्याने आता शेतीत पडून आहेत त्यामुळे आपण आपल्या स्तरावर जिल्हा कृषी अधिकारी यांना पत्र पाठवून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा व या सिंधुदुर्ग जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी मागणी सरपंच सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी उपसरपंच निगुडे गुरुदास गवंडे यांनी सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी श्री.गोरे यांच्याकडे केली आहे यावेळी श्री गोरे यांनी आपण या संदर्भात प्रत्येक मंडळ अधिकारी यांच्याशी बोलून गावागावात जाऊन पंचनामे करण्यास सांगितले आहे तरी पण मी स्वतः या भागामध्ये येऊन पाहणी करणार आहे असं आश्वासनही श्री गोरे यांनी गुरुदास गवंडे यांना दिले आहे


